संचालक बाळासाहेब पाटील यांचा शिंदे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे संचालक श्री. बाळासाहेब पाटील यांनी शिंदे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्यात अलीकडेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे संचालक श्री. बाळासाहेब पाटील यांनी शिंदे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

धाराशिव जिल्ह्यात अलीकडेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यापासून जिल्ह्यातील विविध राजकीय नेते विविध पक्षात प्रवेश करीत आहेत

यावेळी त्यांचे पक्षात शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी राकेश सूर्यवंशी, सागर बाराते, नवनाथ तवले यांच्यासह शिवसेना पक्षातील पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande