शिस्तबद्ध गणेश विसर्जनातून धाराशिवच्या सांस्कृतिक परंपरेला बळ; उत्कृष्ट गणेश मंडळांचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) धाराशिव शहरातील शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक व उत्कृष्ट पथक सादरीकरण २०२५ या स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्मानित करून बक्षिसांचे वितरण करण्यात आले.. गणे
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) धाराशिव शहरातील शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक व उत्कृष्ट पथक सादरीकरण २०२५ या स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्मानित करून बक्षिसांचे वितरण करण्यात आले..

गणेशोत्सव हा सामाजिक एकजूट, सांस्कृतिक परंपरा, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि विधायक विचारांचा उत्सव आहे. धाराशिव शहरातील गणेश मंडळे दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत शिस्त, नियोजन, सामाजिक सलोखा आणि उत्कृष्ट पथक सादरीकरणाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची ही विधायक परंपरा जपत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला..

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गणेश मंडळ, गणेश नगर, द्वितीय क्रमांक लोकमान्य गणेश उत्सव, शेरकर गल्ली, तर तृतीय क्रमांक जय मल्हार गणेश मंडळ, देवकते गल्ली यांनी पटकावला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगळजमाता गणेश मंडळ, तुळजापूर रोड, आदर्श गणेश मंडळ, इंगळे गल्ली आणि रणसम्राट गणेश मंडळ, तांबरी विभाग यांचा सन्मान करण्यात आला.

उत्सवाची भव्यता फक्त गर्दीत किंवा देखाव्यात नसून ती शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याच्या भावनेत असते. धाराशिवची गणेश मंडळ आपल्या कार्यातून हीच संस्कृती जपण्याचे आणि पुढे नेण्याचे काम करत आहेत..

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande