
नवी दिल्ली , 22 सप्टेंबर (हिं.स.)।भारताने मंगळवारी आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे की, मलेशियाच्या ३० दिवसांच्या ‘व्हिसामुक्त’ प्रवेश सुविधेचा वापर नोकरीच्या शोधासाठी करू नये.
क्वालालंपूरस्थित भारतीय उच्चायोगाने सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर एक सल्लागार सूचना जारी करताना म्हटले आहे की, बनावट एजंटांच्या आमिषाला बळी पडून खोट्या नोकरीच्या आश्वासनांवर मलेशियात पोहोचणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उच्चायोगाने स्पष्ट केले आहे की, ३० दिवसांची व्हिसामुक्त प्रवेश सुविधा केवळ पर्यटन आणि सामाजिक भेटींसाठी म्हणजेच फिरण्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी आहे. या सुविधेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे काम किंवा नोकरी करण्याची परवानगी नाही.
भारतीय उच्चायोगाने आपल्या पोस्टमध्ये क्वालालंपूरस्थित भारतीय उच्चायोगाने पर्यटक म्हणून मलेशियात जाऊन तेथे नोकरी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांना सावध केले आहे.सल्लागार सूचनेत पुढे म्हटले आहे की, अनेक भारतीय फसव्या एजंटांच्या खोट्या नोकरीच्या आश्वासनांना बळी पडतात. त्यामुळे ते निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ मलेशियात राहतात. यामुळे त्यांचा मुक्काम बेकायदेशीर ठरतो, त्यांचे शोषण होण्याची शक्यता असते आणि त्यांना ताब्यात घेतले जाऊन कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. हे मलेशियाच्या स्थलांतरविषयक नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
यासोबतच, उच्चायोगाने सल्लागार सूचनेत सांगितले आहे की, खऱ्या पर्यटकांनी मलेशियात पोहोचल्यानंतर कोणत्याही इमिग्रेशन समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक आणि पडताळलेली कागदपत्रे सोबत ठेवावीत. यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे: निश्चित परतीचे तिकीट, हॉटेल बुकिंगचा पुरावा, मलेशियात पोहोचण्याच्या तारखेच्या तीन दिवस आधी भरलेले ऑनलाइन ‘मलेशिया डिजिटल अरायव्हल कार्ड’ (एमजीएसी), किमान सहा महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट.
उच्चायोगाने नागरिकांना स्पष्ट शब्दांत सल्ला दिला आहे की, वैध ‘वर्क परमिट’ किंवा ‘व्हिसा विथ रेफरन्स’ (व्हीडीआर) शिवाय काम किंवा रोजगाराच्या उद्देशाने मलेशियाला अजिबात जाऊ नये.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode