अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सिध्दाराम म्हेत्रेंची एकनाथ शिंदेंकडे मागणी
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अक्कलकोट तालुका हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तालुका आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकरी खचला असताना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने त्याच्या संकटात आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप हंगामावर अवलंब
Ksks


सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अक्कलकोट तालुका हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तालुका आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकरी खचला असताना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने त्याच्या संकटात आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप हंगामावर अवलंबून असते. मात्र, सलग दोन वर्षे नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, ही वस्तुस्थिती माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

मुंबई येथील शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ येथे म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत लेखी निवेदन दिले. यावेळी तालुक्यातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. अल्प व अनियमित पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी अद्याप पूर्णपणे सावरलेला नसतानाच यंदाच्या दुष्काळाने त्याच्यासमोरील आव्हान अधिक गंभीर केले आहे.

तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, पीक विम्यासह शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणी म्हेत्रे यांनी केली. जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, कर्जवसुलीबाबत दिलासा तसेच दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा. अक्कलकोट तालुक्यासाठी विशेष मदत पॅकेज उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. सलग दोन वर्षांच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना शासनाने तातडीने ठोस मदत करून त्यांना आधार द्यावा, अशी मागणी म्हेत्रे यांनी शिंदे यांच्याकडे केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande