
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। 'एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' (ईएफएसएल/कंपनी) ने सुरक्षित आणि परतफेड होणारे 'अपरिवर्तनीय डिबेंचर्स' (एनसीडी/ कर्जरोखे) विक्रीसाठी बाजारात आणल्याची घोषणा आज केली आहे. प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य १,००० रुपये आहे. या रोखेविक्रीतून कंपनी १५० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. मूळ रकमेपेक्षा जास्त मागणी आल्यास अर्थात ग्रीन श्यू पर्यायांतर्गत अतिरिक्त १५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी स्वीकारला जाणार आहे. मूळ रक्कम आणि अतिरिक्त पर्याय असे दोन्ही मिळून कंपनी या रोखेविक्रीतून एकूण ३०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारू शकणार आहे.
या योजनेत १० वेगवेगळ्या मालिका गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांना निश्चित व्याजदर लागू राहणार आहे. सदर डिबेंचर २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. वार्षिक, मासिक आणि मुदतीअंती एकत्रित असे व्याजाचे तीन पर्याय राहणार आहेत. या अपरिवतनीय डिबेंचर्सवर मिळणारा प्रभावी वार्षिक परतावा दरवर्षी ८.६४ टक्के ते १०.०० टक्के या दरम्यान आहे. एनसीडीची सार्वजनिक विक्री २१ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून ती ५ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होणार आहे.
या योजनेद्वारे उभारलेल्या एकूण निधीपैकी किमान ७५ टक्के रक्कम ही कंपनीच्या सध्याच्या कर्जांचे हप्ते (मुद्दल) आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी वापरली जाईल. उरलेली जास्तीत जास्त २५ टक्के रक्कम कंपनीच्या इतर सामान्य कामकाजासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.अर्थात हा सर्व व्यवहार वेळोवेळी सुधारित केलेल्या भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (अपरिवर्तनीय प्रतिभूतींचे इश्यू आणि लिस्टिंग) विनियम, २०२१ (“सेबी एनसीएस विनियम”) च्या अनुपालनानुसार केला जाणार आहे.
या इश्यू अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या एनसीडींना “क्रिसिल ए+/स्टेबल” (उच्चार: “क्रिसिल ए प्लस रेटिंग” विथ स्टेबल आउटलूक) असे मानांकन देण्यात आले आहे.ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड# आणि टिपसन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक (लीड मॅनेजर्स) आहेत. गुंतवणूकदारांना तरलता (लिक्विडिटी) प्रदान करण्यासाठी या एनसीडी बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध केल्या जातील. या योजनेंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या एनसीडींना “क्रिसिल ए प्लस रेटिंग” विथ स्टेबल आउटलूक असे मानांकन देण्यात आले आहे.
ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि टिपसन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या योजनेचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी सदर अपरिवर्तनीय डिबेंचर्स बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (मर्चंट बँकर्स) विनियम, १९९२, सुधारित (मर्चंट बँकर्स विनियम) नुसार, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनीची सहयोगी संस्था मानली जाते. तदनंतर मर्चंट बँकर्स विनियमच्या नियम २१अ आणि नियम २१अ च्या स्पष्टीकरणाच्या तरतुदींचे पालन करून, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड केवळ सदर योजनेतच्या वितरणामध्ये सहभागी असेल आणि सेबी एनसीएस विनियमच्या नियम २५(३) नुसार, एनसीडीच्या योजनेच्या संबंधात ड्यू डिलिजन्स प्रमाणपत्र जारी करणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule