
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ८० मीटर भुईकाटा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन विधान परिषद आमदार सुहास शिरसाट, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतमालाची अचूक व पारदर्शक वजन प्रक्रिया होण्यासाठी भुईकाटा महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. या सुविधेमुळे शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांना अधिक सुलभता निर्माण होऊन व्यवहारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी बाजार समितीमधील व्यापारी बांधव तसेच संबंधित पदाधिकारी व उपस्थित मान्यवर उपस्थित होते. उपस्थित व्यापारी बांधवांशी संवाद साधून बाजार समितीच्या विविध प्रश्नांवर आणि आवश्यक सुविधांबाबत चर्चा केली. बदनापूर बाजार समिती अधिक सक्षम, सुविधायुक्त आणि शेतकरीहितैषी करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. शेतकरी आणि व्यापारी बांधवांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis