पाकिस्तानात पीटीआयच्या मोर्चापूर्वी इस्लामाबादमधील रुग्णालये सज्ज
इस्लामाबाद, 22 सप्टेंबर (हिं.स.)।इस्लामाबादमधील रुग्णालयांना संभाव्य मानवतावादी संकट आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान
पीटीआयच्या २७ सप्टेंबरच्या मोर्चापूर्वी इस्लामाबादमधील रुग्णालये सज्ज; रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द


इस्लामाबाद, 22 सप्टेंबर (हिं.स.)।इस्लामाबादमधील रुग्णालयांना संभाव्य मानवतावादी संकट आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाने, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय), २७ सप्टेंबर रोजी नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

‘ड्रॉप साइट’ने पाहिलेल्या कागदपत्रांनुसार, इस्लामाबादमधील रुग्णालयांना देण्यात आलेल्या निर्देशांमध्ये सर्व नियोजित शस्त्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन शस्त्रक्रिया विभागांना तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहण्याचे आदेश देण्यात आले असून, सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आधीच रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही कामावर परत बोलावण्यास सांगण्यात आले आहे.

पीटीआयच्या २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात आली आहे. इमरान खान यांच्या सुटकेची मागणी करणे हा या मोर्चाचा उद्देश असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या तयारीचा परिणाम रुग्णांवर आधीच होऊ लागला आहे. परिस्थितीची माहिती असलेल्या व्यक्तींनी सांगितले की, सोमवारी शस्त्रक्रिया होणार असलेल्या रुग्णांना त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

रुग्णालयांमध्ये करण्यात येत असलेली ही तयारी पीटीआयच्या आंदोलकांवर होणाऱ्या संभाव्य कारवाईशी थेट संबंधित असल्याचे सरकारने सार्वजनिकपणे सांगितलेले नाही. मात्र, कागदपत्रांमध्ये संभाव्य मानवतावादी संकट आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकणाऱ्या परिस्थितीसाठी तयारीचा स्पष्ट उल्लेख आहे.

रुग्णालयांमध्ये ही तयारी सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी इमरान खान यांच्या तीन बहिणी—अलीमा खान, नोरीन नियाझी आणि डॉ. उजमा खान—तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना ताब्यात घेतले. इस्लामाबादच्या दिशेने नियोजित मोर्चापूर्वी पीटीआयचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली.वृत्तानुसार, २४ तासांच्या आत खान कुटुंबातील आठ सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. अलीमा खान यांचा मुलगा शेरशाह खान यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना काही तासांनंतर सोडण्यात आले, तर खान यांच्या बहिणी अद्याप ताब्यात होत्या.

कागदपत्रांनुसार, अलीमा खान यांना पाकिस्तानच्या ‘सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या कायद्या’च्या कलम ३ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. लाहोरच्या उपायुक्तांनी त्यांना ३० दिवस ताब्यात ठेवण्याचा औपचारिक आदेश जारी केला होता. नोरीन नियाझी आणि उजमा खान यांच्यासाठीही अशाच प्रकारचे ताब्यात ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.२७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जमावाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या सदस्यांविरोधातील कारवाई तीव्र केल्यानंतर या अटक करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande