अमरावती : काँग्रेसची पुनर्बांधणी कार्यकर्त्यांशिवाय कशी होणार - समीर जवंजाळ
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करताना तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी व्यक्त केले. परक्यांना संधी, राजकीय घराण्यांना प्राधान्य
काँग्रेसची पुनर्बांधणी कार्यकर्त्यांशिवाय कशी होणार? - समीर जवंजाळ


अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करताना तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी व्यक्त केले. परक्यांना संधी, राजकीय घराण्यांना प्राधान्य आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला प्रतीक्षा, अशी परिस्थिती राहिल्यास संघटन मजबूत कसे होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अमरावतीतील मागील निवडणुकांचा संदर्भ देताना जवंजाळ यांनी उमेदवार निवड आणि पक्षनिष्ठेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. २०२६च्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला एकही मत न मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी ही बाब केवळ पराभव म्हणून न पाहता संघटनात्मक आत्मपरीक्षणाची संधी मानावी, असे म्हटले.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांशी प्रत्यक्ष संबंध, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि संघटनात्मक योगदान हे उमेदवारीचे महत्त्वाचे निकष असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.“पक्षाला कार्यकर्त्यांतून नेतृत्व घडवायचे आहे की निवडणुकीच्या वेळी तयार चेहरे शोधायचे आहेत?” असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज असल्याचे जवंजाळ यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande