नांदेड - वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीच्या सुधारित दरांची अंमलबजावणी
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीच्या दरांमध्ये शासनाने सुधारणा करून सुधारित दरवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार वाहनांच्या प्रकारानुसार व इंधनाच्या प्रकारानुसार वायुप्रदूषण तपासणीचे सुधारित दर निश्चित करण
नांदेड - वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीच्या सुधारित दरांची अंमलबजावणी


नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीच्या दरांमध्ये शासनाने सुधारणा करून सुधारित दरवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार वाहनांच्या प्रकारानुसार व इंधनाच्या प्रकारानुसार वायुप्रदूषण तपासणीचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १८० रुपये तपासणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी आपल्या वाहनाची विहित मुदतीत वायुप्रदूषण तपासणी करून अधिकृत प्रदूषण तपासणी केंद्रातून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांच्या सूचनेनुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी ही माहिती दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande