छ. संभाजीनगर - आनंद पार्क येथील सिमेंट रस्त्याचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) सिल्लोड येथील आनंद पार्क येथे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले. नगर परिषद निवडणुकीपूर्वी आमदार अब्दुल सत्तार यांनी आनंद पार्क परिसरातील रस्ते विकासाबाबत दिलेला
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) सिल्लोड येथील आनंद पार्क येथे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले.

नगर परिषद निवडणुकीपूर्वी आमदार अब्दुल सत्तार यांनी आनंद पार्क परिसरातील रस्ते विकासाबाबत दिलेला शब्द पूर्ण करत या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे व उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आनंद पार्क परिसरातील रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

आनंद पार्क परिसरातील उर्वरित रस्त्यांची कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande