नांदेडमध्ये पेपरफुटीमुळे त्रस्त एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी आ. रोहित पवारांचा संवाद
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)विविध भरती परीक्षेतील पेपरफुटीमुळं त्रस्त असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी नांदेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. एमपीएससीच्या भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा घेतल्
अ


नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)विविध भरती परीक्षेतील पेपरफुटीमुळं त्रस्त असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी नांदेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. एमपीएससीच्या भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय आणि जबाबदारी निश्चित केल्याशिवाय हा कारभार सुधारणार नाही त्यासाठीच पुण्यात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन उभं राहत आहे. शक्य त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

तसंच विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत भक्कमपणे उभं राहण्याचा विश्वासही यावेळी त्यांना दिला.यावेळी अविनाश राठोड, बाला भैया, संदीप सिरसे, मुरलीधर घुले, सचिन वरपडे, तुषार देशमुख, तात्याराव पाटील, नाना पोहरे, आनंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर, नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande