परभणी - स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पाथरीत पाच ठिकाणी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरांतून अनेक गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यात
Q


परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरांतून अनेक गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यात अनेक रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या सर्व रुग्णांची आमदार राजेश विटेकर यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेला आत्मविश्वास आणि दृष्टी मिळाल्याचा आनंद पाहून मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले.

लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठीची तळमळ आजही आपल्याला मार्गदर्शन करते.

एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणणे, यापेक्षा मोठी समाजसेवा कोणती असू शकते? स्व. अजितदादांच्या विचारांना आणि सेवाभावी कार्याला हीच खरी आदरांजली. गरजूंच्या सेवेसाठी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असे सेवाकार्य यापुढेही निरंतर सुरू ठेवण्याचा संकल्प…!

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande