आ. पवार यांनी केली नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेटून पिकाची पाहणी
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या पिकाची पाहणी केली. गेल्या काही वर्षांत सोयाबीनने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हात दिला त्यामुळं सोयाबीनच्या पेरण
Q


नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या पिकाची पाहणी केली.

गेल्या काही वर्षांत सोयाबीनने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हात दिला त्यामुळं सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रातही सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. परंतु यंदा दुष्काळामुळं सोयाबीन पिकातून एक नवा पैसाही शेतकऱ्याला मिळणार नाही.

हे पीक पूर्णतः करपून आणि वाळून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर भविष्याचं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि त्यांच्याशी बोलताना ते वारंवार जाणवत राहतं.

त्यामुळं या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्याचं आश्वासन देऊन धीर दिला.

यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कपाळे, प्रदेश सरचिटणीस पंकज नाना बोराडे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशील बोरडे, जयवंत वानोळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पनाताई डोंगळीकर, प्रदेश महिला सचिव शैजताताई पाटील, नांदेड युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, नायगाव तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर, समाधान जाधव, आनंद पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande