नांदेड जिल्ह्यातील मिताली अकॅडमी क्रिकेट ग्राउंडला आ. रोहित पवारांची सदिच्छा भेट
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ''मिताली अकॅडमी क्रिकेट ग्राउंड''ला सदिच्छा भेट देऊन उपस्थित युवा खेळाडूंशी मनमोकळी चर्चा केली. ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्
अ


नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 'मिताली अकॅडमी क्रिकेट ग्राउंड'ला सदिच्छा भेट देऊन उपस्थित युवा खेळाडूंशी मनमोकळी चर्चा केली.

ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला अशा सुसज्ज मैदानांमुळं मोठी मदत होत असते. येथील खेळाडूंचा उत्साह पाहून ते भविष्यात निश्चितच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास आहे असे त्यांनी सांगितले यावेळी अकॅडमीचे संचालक डॉ. नंदकिशोर पाटील कुष्णूरे, अरुण पोपले, विशाल पोपले तसेच स्थानिक गावकरी मंडळी उपस्थित होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande