
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, आरोपांची होऊ द्या चौकशी. सगळे सामोरे जायला तयार आहे. तुमच्याशी मैत्री करून आरक्षण सोडायला आम्ही दोन बापाची औलाद नाही.
आंदोलनाच्या काळात आंदोलकांच्या चौकशा होणार, श्रीमंतांना गरीब मराठ्यांना साथ द्यायची नाही का? आज तुमच्या हातात सत्ता आहे. शिंदेंचे आमदार आमच्या चौकशी लावतात का? शिंदेंना सांगा, मराठा आंदोलकांची चौकशी करून तुमचे स्वप्न पूर्ण करून घ्या. निवडून मराठ्यांकडून आले आणि त्यांचीच चौकशी करीत आहेत. तुमची सत्ता पण कधी तरी जाणार आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? किती मराठ्यांचे आंदोलन गुंतविल्यावर शिंदेंचे पोट भरणार आहे? त्यांचे मित्र झालो नाही म्हणून त्यांच्याकडून हा त्रास आहे. राजकीय मराठा हा मराठा आंदोलकांच्या मागे लागला आहे. गरीब मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी पाडा म्हटलं त्या दिवशी तुटून पडा, असे देखील त्यांनी म्हटले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis