
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६७९.५० मि.मी. असून आतापर्यंत ४३०.८० मि.मी. पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ६३.४० टक्के आहे. या कालावधीत अपेक्षित पर्जन्यमान ६२९.७० मि.मी. असून त्याच्या तुलनेत प्रत्यक्ष पर्जन्यमान ६८.४१ टक्के आहे.
जिल्हानिहाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२२.३० मि.मी. म्हणजे सरासरीच्या ७२.६० टक्के, जालना ४३८.५० मि.मी. म्हणजे ७२.७१ टक्के, बीड ३३१.३० मि.मी. म्हणजे ५८.५२ टक्के, लातूर ३५१.७० मि.मी. म्हणजे ४९.८२ टक्के, धाराशिव ३३७.९० मि.मी. म्हणजे ५६.०३ टक्के, नांदेड ५८७.८० मि.मी. म्हणजे ७२.१८ टक्के, परभणी ४२०.७० मि.मी. म्हणजे ५५.२६ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यात ५४३.४० मि.मी. म्हणजे सरासरीच्या ६८.३३ टक्के पर्जन्यमान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या चारा टंचाई नाही
छत्रपती संभाजीनगर विभागात ६ लाख ५० हजार २८२ लहान, २६ लाख ४५ हजार ७२६ मोठी आणि २० लाख ६३ हजार ४५५ शेळी-मेंढी अशी एकूण ५३ लाख ५९ हजार ४६२ पशुधन संख्या आहे. या पशुधनासाठी दररोज सुमारे २० हजार १२५ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत विभागात ४४ लाख ८१ हजार १३६.८५१ मेट्रिक टन चारा उपलब्ध असून सध्या चारा छावणीची आवश्यकता नाही.
सध्या उपलब्ध चारा जिल्हानिहाय साधारणतः ८९ ते २१० दिवस पुरेल एवढा आहे. जालना जिल्ह्यात सर्वात कमी ८९ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis