पुणे - मेट्रोला आठवडाभरात २५ लाख प्रवाशांकडून प्राधान्य
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासी संख्येने उच्चांक प्रस्थापित केला असून, आठवडाभरात २५ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. महामेट्रोला या काळात तीन कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गर्दीत आणखी वाढ अपेक्
Metro Train


पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासी संख्येने उच्चांक प्रस्थापित केला असून, आठवडाभरात २५ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. महामेट्रोला या काळात तीन कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

गर्दीत आणखी वाढ अपेक्षित असून, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सात लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता ‘महामेट्रो’कडून व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षी ३५ लाखांहून अधिक प्रवाशांनी पूर्ण गणेशोत्सवादरम्यान, तर ५ लाख ९० हजार प्रवाशांनी फक्त विसर्जनाच्या दिवशी प्रवासासाठी मेट्रोला पसंती दिली. २०२४ मध्ये पूर्ण उत्सवात २० लाखांहून अधिक, तर विसर्जनाच्या दिवशी सुमारे साडेतीन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. यंदा संपूर्ण उत्सवात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या ४४ लाखांवर जाण्याचा ‘महामेट्रो’चा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande