परभणी - विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी येथे पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि
अ


परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी येथे पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि त्रुटीविरहित ठेवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर नियोजनबद्ध काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बूथनिहाय मतदार यादीची पडताळणी, नवीन पात्र मतदारांची नोंदणी, नावातील चुका व दुरुस्ती, पत्ता बदल, स्थलांतरित तसेच मृत मतदारांच्या नोंदींबाबत आवश्यक कार्यवाही करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांना मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचेही नियोजन करण्यात आले.

प्रत्येक बूथची जबाबदारी संबंधित पदाधिकाऱ्यांवर सोपवून बूथनिहाय कृती आराखडा निश्चित करण्यात आला. तालुकानिहाय, शहरनिहाय आणि बूथनिहाय कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक बाबी संबंधित निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि मतदार यादीतील त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, पंचायत समिती सभापती रवी चव्हाण, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, सोनपेठ शहराध्यक्ष बळीराम काटे, रामेश्वर मोकाशे, पाथरी तालुकाध्यक्ष अविराज टाकळकर, युवक तालुकाध्यक्ष किरण मगर, गणेश मोरे, गजानन आरमाळ, मनोज राऊत, महेश माकोडे, अण्णा आव्हाड, माऊली कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande