पुणे : नवमतदारांना, ३० सप्टेंबरपूर्वी नाव नोंदवण्याचे आवाहन
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)।वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत नवमतदारांना नोंदणीची संधी मिळणार असून, त्यानंतर ऑक्टोबरपासून मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमे
Voter


पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)।वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत नवमतदारांना नोंदणीची संधी मिळणार असून, त्यानंतर ऑक्टोबरपासून मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेची (एसआयआर) सुनावणी सुरू होणार आहे. या प्रक्रियेमुळे नवमतदारांच्या नोंदणीला तात्पुरती स्थगिती दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.

एसआयआर मोहिमेपूर्वी पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्या सुमारे ९० लाख होती. मात्र, विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत तब्बल २८ लाख मतदारांची नावे कमी झाल्याने जिल्ह्याची सध्याची मतदारसंख्या सुमारे ६२ लाखांवर आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील मतदारांचा या प्रक्रियेत समावेश आहे. दरम्यान, एसआयआरच्या सुनावणीदरम्यान स्थलांतरित झालेल्या काही मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच, १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे नव्याने दाखल होणार आहेत.

त्यामुळे सध्याच्या ६२ लाखांच्या मतदारसंख्येत आगामी काळात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज जिल्हा निवडणूक शाखेने व्यक्त केला आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी ३० सप्टेंबरपूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. एसआयआरची सुनावणी सुरू झाल्यानंतर नोंदणी प्रक्रियेत बदल होणार असल्याने पात्र युवकांनी मुदतीपूर्वीच नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande