वर्मोरा ग्रॅनिटोचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। सिरेमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्स, बाथवेअर आणि सॅनिटरीवेअरचे उत्पादन करणाऱ्या वर्मोरा ग्रॅनिटो लिमिटेडचा ७०८.०२ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओसाठी २४ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आ
New IPO Varmora Granito Ltd


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। सिरेमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्स, बाथवेअर आणि सॅनिटरीवेअरचे उत्पादन करणाऱ्या वर्मोरा ग्रॅनिटो लिमिटेडचा ७०८.०२ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओसाठी २४ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यू बंद झाल्यानंतर २५ सप्टेंबरला शेअर्सचे अलॉटमेंट केले जाईल, तर २८ सप्टेंबरला अलॉट झालेले शेअर्स डीमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातील. कंपनीचे शेअर्स २९ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. इश्यू सुरू झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत या आयपीओला १० टक्के सबस्क्रिप्शन मिळाले होते.

या आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी १४० ते १४८ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज १०१ शेअर्सचा आहे. या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स किमान एक लॉट म्हणजेच १०१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. यासाठी त्यांना १४,९४८ रुपये गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे रिटेल इन्व्हेस्टर १,९४,३२४ रुपयांची गुंतवणूक करून कमाल १३ लॉट म्हणजेच १,३१३ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या आयपीओअंतर्गत दोन रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण ४,७८,३९,२५५ शेअर्स जारी केले जात आहेत. यामध्ये सुमारे ३२० कोटी रुपयांचे २,१६,२१,६२१ नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. याशिवाय सुमारे ३८८ कोटी रुपयांचे २,६२,१७,६३४ शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जात आहेत.

या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) यांच्यासाठी ५० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ३५ टक्के आणि नॉन-इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) यांच्यासाठी १५ टक्के हिस्सा राखीव आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून जेएम फायनान्शियल लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला रजिस्ट्रार करण्यात आले आहे. वर्मोरा ग्रॅनिटो लिमिटेडच्या आर्थिक स्थितीबाबत कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीकडे जमा करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी)मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती चढ-उतार होत असली तरी सातत्याने मजबूत राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ४४.९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तो पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये घटून ३०.७७ कोटी रुपये झाला, तर २०२५-२६ मध्ये वाढून ५५.०९ कोटी रुपयांवर पोहोचला.

या कालावधीत कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला १,४७२.५८ कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला होता. तो आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून १,४९२.६८ कोटी रुपये झाला. तर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीला १,५६२.५३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या कालावधीत कंपनीवरील कर्जाच्या ओझ्यात चढ-उतार होत राहिले. आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस कंपनीवर ४१२.८९ कोटी रुपयांचे कर्ज होते. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ते वाढून ५०५.१६ कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीवरील कर्जाचे ओझे कमी होऊन ३५७.९५ कोटी रुपयांवर आले.या कालावधीत कंपनीच्या नेटवर्थमध्येही वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचे नेटवर्थ ६७८.५९ कोटी रुपये होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून ७२२.९० कोटी रुपये झाले. तर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे नेटवर्थ ७९६.८८ कोटी रुपयांवर पोहोचले.

कंपनीच्या रिझर्व्ह आणि सरप्लसबाबतही या कालावधीत वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ते ६३०.२० कोटी रुपये होते. २०२४-२५ मध्ये कंपनीचे रिझर्व्ह आणि सरप्लस वाढून ६९१.७२ कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे रिझर्व्ह आणि सरप्लस ७६५.७० कोटी रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे ईबीआयटीडीए (अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन्स अँड अॅमॉर्टायझेशन) २०२३-२४ मध्ये १५०.३३ कोटी रुपये होते. ते २०२४-२५ मध्ये वाढून १९८.२९ कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे ईबीआयटीडीए वाढून २२१.५६ कोटी रुपयांवर पोहोचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande