
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डोमगाव ता. परांडा जि. धाराशिव येथे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ, नवी मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन, उपचारपद्धती आणि औषधोपचाराबाबत माहिती दिली.
तपासणी दरम्यान गंभीर स्वरूपाच्या आजारांचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी तेरणा हॉस्पिटल, नेरूळ, नवी मुंबई येथे निःशुल्क वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
यावेळी भाजप ज्येष्ठ नेते श्री.मनोहर दादा मिस्कीन मा.सरपंच डोमगाव, श्री. हनुमंत पाटील जिल्हा उपाध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा, श्री. बालाजी मिस्कीन मा.सरपंच, श्री. दीपक गायकवाड ता.अध्यक्ष अ. जा.भाजपा , श्री. रणजीत मिस्कीन युवा नेते डोमगाव, श्री. बबन मिस्कीन, श्री. अनिल गायकवाड, श्री. रामलिंग साबळे, श्री. सोमनाथ मिस्कीन, श्री. समाधान मिस्कीन, श्री. तानाजी पाटील, श्री. अशोक चव्हाण, श्री. भास्कर साबळे, श्री. किशोर भिरड, श्री. नामदेव जगताप, श्री. मोहन काळे, श्री. प्रशांत खैरे, श्री. लक्ष्मण गायकवाड, श्री. संजय आबा मिस्कीन, श्री. महेश शिंदे, श्री. हनुमंत लोखंडे, श्री. सौदागर काळे, श्री. पोपट कोळी, श्री. शिवाजी मिस्कीन यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis