बीड - काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा परळी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार
बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, परळी शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब गित्ते, तर शहराध्यक्षपदी रसूल खान
सत्कार


बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, परळी शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब गित्ते, तर शहराध्यक्षपदी रसूल खान यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रकाशराव देशमुख व बहादूरभाई, तर सरचिटणीसपदी इतशाम खतीब व विश्वनाथ गायकवाड यांची निवड झाली आहे. परळी शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी वैजनाथ गाडेकर, चांद मेहबूब व शेख जावेद, तर सरचिटणीसपदी दीपक सिरसाट यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका काँग्रेसमध्ये तांदळे साहेब यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रकाशराव देशमुख यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब गित्ते आणि शहराध्यक्षपदी रसूल खान यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यांना अॅड. अनिल मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशराव देशमुख, विश्वनाथ गायकवाड व बहादूरभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास अॅड. अनिल मुंडे, प्रकाशराव देशमुख, बहादूरभाई, विश्वनाथ गायकवाड, शशी चौधरी, इतशाम खतीब, सुभाष देशमुख, वैजनाथ गाडेकर, शेख जावेद, चांद मेहबूब, दीपक सिरसाट, रणजित देशमुख, तांदळे साहेब, गुलाबराव देवकर, फरकुंद अली बेग, मुरकुटे, गित्ते साहेब, रसूल खान, बाळासाहेब गित्ते, बब्बूभाई नगरसेवक, अनंत देशमुख आदी उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, तसेच युवकांना पक्षाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande