
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)।
पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत TAIT-2025 टप्पा-१ अंतर्गत मुलाखतीशिवाय निवड या प्रकारातील रूपांतर फेरीची (Converted Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी या फेरीत ४,३९० उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
यानंतर मुलाखतीसह निवड या प्रकारातील रूपांतर फेरीची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिली. राज्य मंडळाच्या शारदा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरावर ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रार अर्ज २७ सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु