पुणे - अनधिकृत केबल्स तात्काळ हटवा अन्यथा कठोर कारवाईचा आयुक्त यांचा इशारा
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे केबल ऑपरेटर्सनी दूरसंचार कायद्यानुसार तसेच महापालिकेच्या नियमांनुसार आवश्यक त्
PCMC


पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)।

अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे केबल ऑपरेटर्सनी दूरसंचार कायद्यानुसार तसेच महापालिकेच्या नियमांनुसार आवश्यक त्या परवानग्या घेऊनच केबल्स टाकणे गरजेचे आहे. वृक्ष, विद्युत खांब, इमारती, फुटपाथ अथवा इतर अनधिकृत ठिकाणी टाकण्यात आलेल्या केबल्स संबंधित ऑपरेटर्सनी तातडीने हटवाव्यात अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ओव्हरहेड केबल्सचे नियमन तसेच प्रस्तावित मानक कार्यपद्धती (SOP) संदर्भात केबल ऑपरेटर्सच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बोलत होते.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, महेश कावळे, उप आयुक्त राजेश आगळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संबंधित विभागांचे उपअभियंता, कर्मचारी तसेच विविध केबल ऑपरेटर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील केबल व्यवस्थेला अधिक नियोजित, सुरक्षित आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि केबल ऑपरेटर्स यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande