पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण
पिंपरी, 22 सप्टेंबर, (हिं.स.) : स्वच्छतेची सवय आणि सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचे रूप पालटू शकते, याचा प्रत्यय वाघेश्वर घाट परिसरात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीन
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण


पिंपरी, 22 सप्टेंबर, (हिं.स.) : स्वच्छतेची सवय आणि सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचे रूप पालटू शकते, याचा प्रत्यय वाघेश्वर घाट परिसरात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील साठेनगर, चऱ्होली बु. येथील वाघेश्वर घाट परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच उपलब्ध जागेचा कल्पक पद्धतीने वापर करण्यात आला. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक जागेचे सौंदर्य वाढण्यासोबतच पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. स्वच्छतेसोबतच उपलब्ध जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर केल्यास परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू शकतो. स्वच्छ, सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.”

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande