नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प
नांदेड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 775 जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 31 हजार 360 कामांना ता
नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प


नांदेड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 775 जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 31 हजार 360 कामांना तांत्रिक मान्यता, तर 28 हजार 401 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 हजार 1 जलताऱ्यांची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत.

जलसंधारणाच्या या कामांमुळे संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील व शेतजमिनीवरील आवश्यक जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण, बोअरवेल/बोअर पुनर्भरण तसेच इतर जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

“पाणी अडवा-पाणी जिरवा, भूजल वाढवा-पाणीटंचाई टाळा” या उद्देशाने ग्रामस्थ, शेतकरी व ग्रामपंचायतींनी जलसंधारणाच्या कामांमध्ये व्यापक सहभाग नोंदवावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande