सोलापूर - रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद २०२६ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने विजापूर रोड येथील रामलिंग सोसायटी, रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती देण्यात
सोलापूर - रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद २०२६ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती


सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने विजापूर रोड येथील रामलिंग सोसायटी, रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. या माध्यमातून शासनाच्या योजना व उपक्रमाची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच मिळत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य कुलकर्णी यांनी केले.

प्रारंभी माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि नागरिकांमध्ये शासकीय कार्यक्रमांविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, रोजगार, कौशल्य विकास तसेच नागरिकांसाठीच्या अन्य लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवून जनजागृतीस हातभार लावावा, असेही सांगण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गणेश मंडळे तसेच नागरिकांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाचे फोटो, व्हिडिओ, कथा आणि रील्स ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org)या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande