
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याचा काटकसरीने वापर करत शेतीत उत्तम उत्पादन घेणारे चिखली येथील प्रगतशील शेतकरी श्री. जयराम शाहूराज चोबे यांनी आमदार जगजीत सिंह राणा यांची भेट घेतली. यावेळी श्री. कुंद पाटील, श्री. सिद्धेश्वर सुरवसे यांच्यासह इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
पाण्याची उपलब्धता मर्यादित असतानाही योग्य नियोजन, आधुनिक शेती पद्धती, मेहनत आणि प्रयोगशील दृष्टिकोनातून त्यांनी उत्तम दर्जाचे डाळिंब उत्पादन घेतले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीतही डाळिंबाची बाग जपून दर्जेदार उत्पादन घेण्याचा त्यांचा हा प्रयोग निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ‘कमी पाण्यात अधिक उत्पादन’ हा शेतीचा दृष्टिकोन भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, पीक पद्धतीतील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत चांगले परिणाम साधता येतात, हे जयराम चोबे यांच्या शेतीतून पाहायला मिळते.
दुष्काळी परिस्थितीतील जिद्द, नियोजन आणि प्रयोगशीलतेतून शेतीचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जयराम चोबे यांचा मनापासून अभिमान वाटतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis