
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)।
शासनाने अधिसूचनेद्वारे ‘महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम, २०२६’ प्रसिद्ध केले आहेत. या अधिसूचनेतील नियम ६६ वगळता इतर तरतुदी शालेय बस व शालेय व्हॅनशी संबंधित आहेत.
या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शालेय बस व शालेय व्हॅनधारकांनी शासन अधिसूचनेनुसार आपल्या शालेय बस, शालेय व्हॅन तसेच त्यांच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. अधिसूचना दि. प्रसिद्ध झाल्याने, त्यानंतर तीन महिन्यांच्या आत आवश्यक सुधारणा करून घेणे बंधनकारक आहे.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता संबंधित वाहनधारकांनी सुधारित नियमांचे पालन करून आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis