आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ : जपानवर ३-० ने विजय मिळवत भारताचे पुरुष सांघिक बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित
नागोया (जपान), 22 सप्टेंबर (हिं.स.) आशियाई क्रीडा स्पर्धेती पुरुष सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने यजमान जपानचा उपांत्यपूर्व फेरीत ३-० असा पराभव करून पदकाची निश्चिती केली आहे. लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि आयुष शेट्टी यांनी
लक्ष्य सेन


नागोया (जपान), 22 सप्टेंबर (हिं.स.) आशियाई क्रीडा स्पर्धेती पुरुष सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने यजमान जपानचा उपांत्यपूर्व फेरीत ३-० असा पराभव करून पदकाची निश्चिती केली आहे. लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि आयुष शेट्टी यांनी आपापले सामने जिंकून हा विजय साकारला.

लक्ष्यने जपानच्या कोडाई नारओकाचा एका रोमांचक तीन-गेमच्या लढतीत पराभव केला. सुरुवातीचा गेम गमावल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. सेन पहिला गेम ११-२१ असा हरला, परंतु दुसऱ्या गेममध्ये त्याने जोरदार मुसंडी मारत १९-४ अशी आघाडी घेतली आणि २१-५ ने तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. निर्णायक गेममध्ये भारतीय बॅडमिंटनपटू ८-१४ असा पिछाडीवर होता. पण त्याने दमदार पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर २१-१९ ने गेम जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरी जोडीने जपानच्या होकी/कोबायाशी जोडीचा २१-१८, २४-२२ असा पराभव करून भारताची आघाडी २-० अशी वाढवली.अटीतटीच्या सुरुवातीनंतर भारतीय जोडीने सावरत पहिला गेम २१-१८ असा जिंकला. दुसरा गेमही चुरशीचा झाला; १९-१९ आणि २०-२० अशी बरोबरी झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी अखेरीस २४-२२ ने विजय मिळवला.

सामना जिंकण्यासाठी भारताला आणखी एका विजयाची गरज असताना, आयुष शेट्टीने आपल्या जपानी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संयमी खेळ केला. आयुषने दमदार सुरुवात करत ७-२ अशी आघाडी घेतली आणि ती १६-५ पर्यंत वाढवली, त्यानंतर पहिला गेम २१-१० असा जिंकला. भारतीय खेळाडूने दुसऱ्या गेममध्येही आपला वेग कायम राखला आणि अखेरीस २१-१९ ने विजय मिळवून भारताचा ३-० असा विजय पूर्ण केला. या विजयामुळे पुरुष सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पदक निश्चित झाले आणि संघाने आशियाई खेळांच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande