
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित मतदारसंघातील जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचा या निवडणूक प्रक्रियेशी नेमका संबंध, निवडणुकीचे वेळापत्रक, मतदानाची तारीख आणि उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख याबाबतची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड