
बीड, 22 सप्टेंबर, (हिं.स.) केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील आकाश नितीन बोबडे हा १६ वर्ष वयाचा विद्यार्थी हा गोटेगाव ता. केज येथील सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आकाश नितीन बोबडे या विद्यार्थ्याने त्यांचे आई-वडील घरी नसताना बोबडेवाडी येथील त्याच्या राहत्या घरात भिंतीला खिळा ठोकून नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सय्य्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे, मुंडे यांनी आकाश बोबडे याचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे.
दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट समजलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis