इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
लंडन, 22 सप्टेंबर, (हिं.स.) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दीर्घकाळ चाललेल्या दुखापतींच्या संघर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वूड म्हणाला की, जवळपास वर्षभर दुखापतींशी झुंज दिल्यानंतर त्याला असे वाटले की तो लढाई
मार्क वूड


लंडन, 22 सप्टेंबर, (हिं.स.) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दीर्घकाळ चाललेल्या दुखापतींच्या संघर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वूड म्हणाला की, जवळपास वर्षभर दुखापतींशी झुंज दिल्यानंतर त्याला असे वाटले की तो लढाई हरला आहे.

वूडने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत खेळला होता. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो ॲशेस मालिकेतून बाहेर पडला. तेव्हापासून तो कोणताही स्पर्धात्मक क्रिकेट किंवा फ्रँचायझी क्रिकेट खेळलेला नाही.

वूडचा केंद्रीय करार लवकरच संपणार आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची ही एक नैसर्गिक वेळ असल्याचे त्याने म्हटले आहे. तो म्हणाला की, त्याला नेहमीच दुखापतीतून परत येऊन लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते, पण यावेळी तो तसे करू शकला नाही.

वूडने सोशल मीडियावर लिहिले, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षाचा विचार करता, हे आश्चर्यकारक वाटणार नाही, पण माझ्या कराराच्या शेवटी, हा निर्णय घेण्याची ही नैसर्गिक वेळ आहे असे मला वाटते.तो म्हणाला, मी नेहमीच खंबीर राहण्याचा आणि दुखापतीतून परत येऊन लोकांना चुकीचे सिद्ध करण्याचा व मी काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवाने, यावेळी मी ही लढाई हरलो. वैद्यकीय सल्ल्यानुसार कसोटी क्रिकेट आणि ५० षटकांचे क्रिकेट माझ्यासाठी शक्य नाही. गेल्या वर्षभरात, इंग्लंडकडून खेळण्याचे स्वप्न हळूहळू माझ्या हातून निसटत गेले आहे.

२०१९ चा विश्वचषक आणि २०२२ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग असलेल्या वूडने ३८ कसोटी सामन्यांमध्ये ११९ बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी ३०.७९ होती, आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी ६/३७ ही होती. त्याने कसोटी सामन्यांमध्ये पाच वेळा एका डावात पाच किंवा अधिक बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, वूडने ७० सामन्यांमध्ये ४०.८२ च्या सरासरीने ८० बळी घेतले, आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/३३ ही होती. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, त्याने ३८ सामन्यांमध्ये २०.२४ च्या सरासरीने ५४ बळी घेतले, आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/९ ही होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande