जालन्यात २० क्विंटल तांदूळ जप्त; काळ्या बाजारात विक्रीचा संशय
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। जालना शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात लेकवूड हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सुमारे २० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे. सदर धान
Q


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। जालना शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात लेकवूड हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सुमारे २० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे. सदर धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये ५० किलो वजनाचे एकूण ४५ तांदळाचे कट्टे आढळून आले. या तांदळाचे एकूण वजन अंदाजे २० क्विंटल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयावरून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी आशीमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश थेरे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय जालना आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील तहसीलदार सचिन यादव तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी (पुरवठा) महेश थेरे यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा क्रमांक ०५२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सदाशिव विनायक राठोड करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande