रत्नागिरी : लांज्यात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर
रत्नागिरी, 23 सप्टेंबर, (हिं.स.) । लांज्यातील धुंदरे येथील दुड्ये अॅग्रो फार्मवर गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात ९ फूट लांबीचा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खुराड्यात शिरलेल्या या अजगराने काही कोंबड्या फस्त केल्यानंतर तो तेथेच अडकून पडला. ख
लांज्यात सापडलेला अजगर


रत्नागिरी, 23 सप्टेंबर, (हिं.स.) । लांज्यातील धुंदरे येथील दुड्ये अॅग्रो फार्मवर गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात ९ फूट लांबीचा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खुराड्यात शिरलेल्या या अजगराने काही कोंबड्या फस्त केल्यानंतर तो तेथेच अडकून पडला.

खुराड्यात अजगर असल्याची माहिती प्रसाद अनिल दुड्ये यांनी सर्पमित्र मंगेश पांचाळ यांना दिली. माहिती मिळताच पांचाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. योग्य ती खबरदारी घेत त्यांनी अजगराला खुराड्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर या अजगराला सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या घटनेच्या वेळी धुंदरे गावचे पोलीस पाटील विकास करंबेले, प्रसाद अनिल दुडये, प्रभाग क्रमांक १च्या नगरसेविका निधी निलेश गुरव, नितीन करंबेळे, शैलेश पांचाळ आणि विठ्ठल कुळ्ये उपस्थित होते.

सर्पमित्र मंगेश पांचाळ यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या प्रयत्नांमुळे खुराड्यात अडकलेल्या ९ फूट अजगराची कोणतीही इजा न होता सुखरूप सुटका झाली. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याने नागरिकांनीही सुटकेच्या या मोहिमेचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande