
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद २०२६ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण बाल गणेश मंडळ, साईमाऊली मंदिर, गवळीपुरा रिसाला येथे लोकसंवाद व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देतानाच लोकसंवाद तध्यचे आयुष्मान भारत योजनेसह विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
शिबिरासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आयुष्मान भारत कार्डाचे महत्त्व, योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पुंडगे व आरोग्य सेवक गजानन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनी शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पुंडगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. शाम टरके, उपसंपादक अलका पाटील, मानसी राऊत, आरोग्य सेवक गजानन देशमुख, अधिपरिचारिका भारती वैद्य, आशा कोरडे, प्रज्ञा इंगोले, सीमा सरकटे, अनुराधा महाजन, धम्मराज रसाळ, माया पाईकराव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis