बीडच्या गेवराई पोलिसांची कारवाई; ७ गावठी हातभट्टी दारू अड्डे आणि जुगार अड्ड्यावर छापा
बीड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत ७ ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर आणि १ जुगार अड्ड्यावर छापे मारले. या कारवाईत एकूण ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दार
पोलीस कारवाई


बीड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत ७ ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर आणि १ जुगार अड्ड्यावर छापे मारले. या कारवाईत एकूण ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारू प्रकरणात ७ जणांसह ४ महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ताकडगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोटारसायकल व रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande