श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सापडलेली रोख रक्कम व चांदी सदृश्य चैन भाविकास परत
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सापडलेली रोख रक्कम व चांदी सदृश्य चैन भाविकास परत करण्यात आली श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील आरती पॉईंट येथे सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांना एका भाविकाची पर्स सापडली. सद
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सापडलेली रोख रक्कम व चांदी सदृश्य चैन भाविकास परत करण्यात आली

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील आरती पॉईंट येथे सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांना एका भाविकाची पर्स सापडली. सदर पर्समध्ये रोख रक्कम ११ हजार ९७९ रुपये तसेच चांदी सदृश्य चैन आढळून आली.

सुरक्षा रक्षकांनी पर्समधील वस्तूंच्या आधारे संबंधित भाविकाची ओळख पटवून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सदर रोख रक्कम व चांदी सदृश्य चैन संबंधित भाविक माधुरी सतीश इंगोले, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना परत करण्यात आली. यावेळी सुपरवाजर कमलाकर पवार, अनिल लोखंडे व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande