
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)।दुष्काळाच्या या कठीण काळात आपलं महायुती सरकार शेतकरी बांधवांसोबत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ भागांचा दौरा करण्यासाठी आले असताना ते बोलत होते
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सरसकट मदत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही वेगाने केली जात आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचा शासन निर्णय (GR) काढून मदत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या संकटात एका शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, कोणत्याही घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या कठीण काळात सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. संकट कितीही मोठे असो, शेतकरी बांधवांच्या घरातील चूल आणि मुलांच्या शिक्षणाची ज्योत विझू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis