महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयशिंह चव्हाण यांनी बुधवार, २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील विविध गावांतील शेतांची पाहणी केली. यावेळी महातपुरी येथील ग
अ


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयशिंह चव्हाण यांनी बुधवार, २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील विविध गावांतील शेतांची पाहणी केली.

यावेळी महातपुरी येथील गट क्रमांक २९५ मध्ये शेतकरी राम केरबा मुलगीर यांच्या शेतावर मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. याठिकाणी शून्य उत्पादनाचा पंचनामा करण्यात आला. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी महातपुरी, माखणी, शिरसम, जवळा परिसरातील शेतांवर भेटी देऊन पिकांची स्थिती आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी जीवराज डाकघर, तहसीलदार गंगाखेड, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पाहणीवेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande