ज्ञानोपासक महाविद्यालयात भारतीय मत्स्यखाद्य महोत्सव
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूरयेथील ज्ञानोपासक महाविद्यालयात मत्स्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय मत्स्यखाद्य महोत्सव व मत्स्य ओळख तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्
ज्ञानोपासक महाविद्यालयात भारतीय मत्स्यखाद्य महोत्सव


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूरयेथील ज्ञानोपासक महाविद्यालयात मत्स्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय मत्स्यखाद्य महोत्सव व मत्स्य ओळख तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयातील मत्स्यशास्त्र विभागात 'भारतीय मत्स्यखाद्य महोत्सव' व 'मत्स्य ओळख तंत्रज्ञान कार्यशाळा' या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. धनाजी पाटील व डॉ. संदीप मरकड (सेनगाव) हे उपस्थित होते.

यावेळी उपप्राचार्य डॉ. शाम गोरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष जाधव, नॕकचे समन्वयक प्रा. डॉ. दिनकर कोतवाल यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेत विविध जिवंत मत्स्य प्रजातींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मत्स्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. पाटील व डॉ. मरकड यांनी उपस्थितांना कटला, रोहू, मिरगल, झिंगा, खेकडा इत्यादी विविध मत्स्य प्रजातींची ओळख करून दिली. तसेंच त्यांचे वेगळेपण, वैशिष्ट्ये व वर्गीकरण याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्य मत्स्य अभ्यासक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. तर 'मत्स्यखाद्य महोत्सव' मध्ये स्वतः विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मत्स्य पाककृती तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले. सूत्रसंचालन मत्स्यगंधा मंडळाचे अध्यक्ष आकाश देवकते तर आभारप्रदर्शन मत्स्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. निवृत्ती पोपतवार यांनी केले. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रवी कावळे, प्रा. डॉ. भागवत ठाकरे, प्रा. शिरीषकुमार रुद्रवार, प्रा. डॉ. नयना रत्नपारखी, संशोधक विद्यार्थिनी पूजा तरटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande