साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची चौकशी करा; परभणी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय द्यावा, तसेच जातीय छळाच्या गंभीर आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय शि
Q


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय द्यावा, तसेच जातीय छळाच्या गंभीर आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात साहिल यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, जातीय छळ व मानसिक त्रासाच्या आरोपांची सखोल चौकशी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, तपास पूर्ण होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यावर दोषारोप करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, कुटुंबीयांना आर्थिक व शासकीय मदत तसेच देशातील आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरोधात स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात ठोस आणि समाधानकारक कार्यवाही न केल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सचिव सुहास पंडित, मागासवर्गीय विभागाचे प्रा. तुकाराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र सोनकांबळे, भीमशक्ती संघटनेचे सतीश भिसे, राजेश रेंगे, ज्ञानेश्वर वाघमारे, प्रसाद डुकरे पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande