जेएसडब्ल्यू समूहाची AMPSTAR सह इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात धडाकेबाज एन्ट्री
* छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीनफील्ड प्रकल्पात उत्पादित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सचा समावेश मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.) - जेएसडब्ल्यू समूहाची व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने मंगळवारी AMPSTAR
जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेड AMPSTAR ब्रँड इलेक्ट्रिक बसेस ट्रक्स


जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेड AMPSTAR


* छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीनफील्ड प्रकल्पात उत्पादित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सचा समावेश

मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.) - जेएसडब्ल्यू समूहाची व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने मंगळवारी AMPSTAR हा ब्रँड सादर केला. कंपनी या ब्रँडअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची रचना, निर्मिती आणि विक्री करणार आहे. या उपक्रमाद्वारे समूहाने कमर्शिअल मोबिलिटी क्षेत्रात पदार्पण केले आहे.

हा ब्रँड AMPSTAR: powered by JSW या ओळखीसह बाजारात येईल. AMPSTAR ची रचना ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासाचा विचार करून, एक सर्वसमावेशक व्यावसायिक गतिशीलता सेवा म्हणून करण्यात आली आहे. केवळ वाहनांची निर्मितीच नाही, तर चार्जिंग सुविधा, ऑपरेटिंग सोल्युशन्स, आर्थिक सहकार्य आणि विक्री-पश्चात सेवा यांचाही यात समावेश आहे; जेणेकरून चालक आत्मविश्वासाने इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करू शकतील. ग्राहकांना 150 kW ते 500 kW क्षमतेचे पॉवर कॉन्फिगरेशन्स निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच, थेट खरेदी, लीजिंग, बॅटरी ॲज अ सर्व्हिस (BaaS) आणि मालकी हक्काच्या किंवा संचालनाच्या इतर विविध पर्यायांपैकी निवड करण्याची सुविधाही त्यांना मिळेल.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक (AURIC) मध्ये ९० एकरवर पसरलेल्या, भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ईव्ही (EV) उत्पादन प्रकल्पात AMPSTAR वाहनांची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पाची वार्षिक क्षमता १५,००० इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स इतकी असेल. बस उत्पादनासाठी भारतातील पहिली 'प्री-ट्रीटमेंट आणि इलेक्ट्रो-डिपॉझिशन' (PT-ED) प्रक्रिया (जी प्रगत ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी तंत्रज्ञान प्रणाली आहे) तसेच स्वयंचलित ट्रक-कॅबिन लाइन आणि एकात्मिक बॅटरी इकोसिस्टम यांचा या प्लांटमध्ये समावेश असेल.

भारतातील वापराच्या परिस्थितीनुसार ही वाहने कंपनीने स्वतः विकसित केली आहेत. जेएसडब्ल्यू ग्रीनटेकने संपूर्ण इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनसाठी आवश्यक असलेली मूळ प्रणाली, सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम विकसित केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार वाहनांमध्ये बदल करणे शक्य होते. या वाहनांच्या रचनेत डबल कूलिंग बॅटरी सिस्टम आणि हाय-स्ट्रेंथ मोनोकॉक चेसिसचा समावेश आहे, जे खास करून भारताचे हवामान आणि रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले, इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला, तेव्हा मी याकडे राष्ट्रनिर्मितीचे एक पाऊल म्हणून पाहिले - म्हणजेच बाहेरून आयात केलेल्या इंधनाऐवजी भारतातच निर्माण झालेल्या ऊर्जेवर वाहतूक करणे. जागतिक तेलाच्या किमतींवर आपले नियंत्रण असू शकत नाही, परंतु त्यावर आपण किती अवलंबून राहायचे, हे नक्कीच आपल्या हातात आहे.

'AMPSTAR' बाबतची आमची महत्त्वाकांक्षा एका वाक्यात सांगायची तर ती अशी आहे की, भारताच्या वाहतूक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी 'AMPSTAR' हे एक प्रभावी माध्यम बनावे अशी आमची इच्छा आहे. हा केवळ व्यावसायिक प्रश्न नाही, तर एक देश म्हणून आपण कसे आहोत आणि आपल्याला कसे बनायचे आहे, याचा हा मुद्दा आहे. प्रत्येक ग्राहकाने इलेक्ट्रिक बस आणि ट्रकची निवड करण्याचे धाडस दाखवण्यासाठी केवळ भावना नव्हे, तर आर्थिक व्यवहार्यता महत्त्वाची ठरते. जेव्हा ग्राहक हा निर्णय घेतात, तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या वाहनापुरते मर्यादित राहात नाहीत; तर ऊर्जा सुरक्षा, लॉजिस्टिक्सचा कमी खर्च, भारतीय उद्योगांची जागतिक स्तरावरील वाढलेली स्पर्धाक्षमता, भारतातच निर्माण झालेली मजबूत उत्पादन परिसंस्था (मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम) आणि पुढच्या पिढीसाठी अधिक स्वच्छ भविष्य असे अनेक सकारात्मक परिणाम साधले जातात. याच प्रवासाची सुरुवात आज AMPSTAR करत आहे – टप्प्याटप्प्याने पुढे जात, भारताच्या वाहतूक पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने.

याबाबत अधिक माहिती देताना जेएसडब्ल्यू समूहाचे पार्थ जिंदाल म्हणाले, जेएसडब्ल्यूची संपूर्ण ताकद व्यावसायिक गतिशीलता (कमर्शियल मोबिलिटी) क्षेत्रात आणणारे AMPSTAR हे एक उद्देश्य आहे आणि त्यामागे एकच महत्त्वाकांक्षा आहे – ती म्हणजे भारतातील लोकांचा प्रवास आणि मालाची वाहतूक करण्याची पद्धत बदलणे. अनेक महिने ग्राहक आणि संबंधित घटकांचे म्हणणे जाणून घेण्यात आम्ही घालवले आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली: या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यातील खरी आव्हाने ही केवळ वाहनापुरती मर्यादित नाहीत, तर त्याहीपलीकडे आहेत. म्हणूनच आम्ही ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासाचा विचार करून रचना करण्यास सुरुवात केली आणि फुल-स्टॅक इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी सोल्यूशन विकसित केले. AMPSTAR मध्ये दोन प्रभावी संकल्पनांचा संगम साधला आहे: Amp हा शब्द Ampere (विद्युत प्रवाहाचे एकक) वरून आला आहे, जो कार्यक्षमता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे; तर Star हा शब्द आकांक्षा, नेतृत्व आणि प्रगती दर्शवतो. ब्रँडची ओळखही याच महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे – आधुनिक, प्रगतीशील आणि तरीही वेगळेपण जपणारी. हेच आमचे वचन आहे: प्रत्येक ग्राहकाच्या प्रवासात आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संक्रमण अधिक सोपे, विश्वसनीय तसेच फायदेशीर बनवू.

ग्राहकांसाठीच्या व्यावसायिक फायद्यांबाबत बोलताना, जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडचे सीईओ सुमित मित्तल म्हणाले, “इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीसाठी (व्यावसायिक वाहतुकीसाठी) AMPSTAR हे आमचे व्हिजन आहे आणि आज त्याची सुरुवात होत आहे. या वाहनांची रचना, अभियांत्रिकी आणि निर्मिती भारतातच, अगदी सुरुवातीपासून आम्ही करत आहोत; यात आमचे स्वतःचे ड्राइव्हट्रेन आणि सॉफ्टवेअर असून, सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे आणि ही वाहने भारतीय रस्ते तसेच येथील कामकाजाच्या परिस्थितीला साजेशी अशी बनवण्यात आली आहेत. आमची उत्पादने सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. बसेसच्या बाबतीत, आमच्या पोर्टफोलिओमध्ये 7 मीटर ते 18 मीटर लांबीच्या बसेसचा समावेश असेल, ज्या कर्मचारी वाहतूक, शहर व आंतर-शहर वाहतूक आणि शालेय वाहतूक अशा विविध सेवांसाठी उपयुक्त ठरतील. ट्रक्सच्या बाबतीत, आम्ही 55-टन क्षमतेच्या ट्रॅक्टर-ट्रेलरपासून सुरुवात करत आहोत — जी वाहन रचनेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक श्रेणी मानली जाते — आणि आगामी महिन्यात टिपर्स व फिक्स्ड-बॉडी डंपर्सच्या श्रेणीतही विस्तार करण्याची आमची योजना आहे. भारतातील रस्त्यांवर जागतिक दर्जाच्या बसेस आणि ट्रक्स मिळायला हवेत आणि AMPSTAR च्या माध्यमातून आम्ही तेच साध्य करू पाहात आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande