‘लोकसंवाद-2026’ अभियानाला पाटीलगल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार, 23 सप्टेंबर (हिं.स.) : माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात जाऊन शासनाच्या लोककल्
शासकीय योजनांची जनजागृती


नंदुरबार, 23 सप्टेंबर (हिं.स.) : माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात जाऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यातील पाटीलगल्ली (वाघाळे) येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाईसेवा केंद्र चालक योगेश गावित यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ कार्ड तयार करणे, ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच कृषी, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, कौशल्य विकास आणि सहकार विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. संबंधित योजना कोणत्या विभागामार्फत राबविल्या जातात आणि अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘लोकसंवाद-2026’ अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाची माहिती दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘बाप्पा डॉट कॉम’वर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील दिनेश चौरे, विकास नाटे, चंद्रकांत अहिरे, ग्रामपंचायत सदस्य धनाजी गायकवाड, सखुबाई गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष उदय गांगुर्डे, सचिव रोशन गांगुर्डे, खजिनदार तुषार गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, गणेश मंडळाचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande