
लातूर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड, लातूर आणि मराठवाड्यातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. नांदेड-पनवेल आणि पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला कायमस्वरूपी तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आल्याने आता ही गाडी १७ ऐवजी २० डब्यांची झाली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलामुळे विशेषतः नवरात्रोत्सव, दिवाळी आणि आगामी
उपलब्धता वाढणार असून, सतत प्रतीक्षा यादीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नांदेडहून २२ सप्टेंबरपासून, तर पनवेलहून २३ सप्टेंबरपासून ही वाढीव संरचना लागू झाली आहे.लातूरसह धाराशिव, बार्शी, लातूर रोड, परळी, परभणी आणि नांदेड परिसरातील प्रवाशांसाठी मुंबईशी थेट रेल्वे संपर्काची ही महत्त्वाची कडी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis