वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। वनप्लसने भारतीय बाजारपेठेत आपला नवा बजेट स्मार्टफोन ‘वनप्लस एन६ लाइट ४जी’ लाँच केला आहे. हा स्मार्टफोन निओ ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. नावाप्रमाणेच हा केवळ ४जी नेटवर्कला सपोर्ट करतो.
OnePlus Launches Budget Smartphone N6 Lite 4G


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। वनप्लसने भारतीय बाजारपेठेत आपला नवा बजेट स्मार्टफोन ‘वनप्लस एन६ लाइट ४जी’ लाँच केला आहे. हा स्मार्टफोन निओ ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. नावाप्रमाणेच हा केवळ ४जी नेटवर्कला सपोर्ट करतो. त्यामुळे या फोनमध्ये ५जी नेटवर्कचा वापर करता येणार नाही. कंपनीने हा स्मार्टफोन एकाच प्रकारात सादर केला असून, त्यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. एन६ लाइट ४जीची किंमत केवळ 16,999 आहे.

वनप्लस एन६ लाइट ४जीमध्ये ६.७५ इंचांची एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन १५७० बाय ७२० पिक्सेल असून, २०:९ आस्पेक्ट रेशो आणि ९०.५ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस ९०० निट्स असून, २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट मिळतो. यामध्ये सनलाइट डिस्प्ले, आय प्रोटेक्शन मोड, स्क्रीन रिफ्रेश रेट स्विचिंग, स्क्रीन कलर मोड आणि डार्क मोड यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कामगिरीसाठी या फोनमध्ये युनिसॉक टी७२५० चिपसेट देण्यात आला आहे. ४ जीबी रॅमसोबत व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून आणखी ८ जीबीपर्यंत रॅम वाढवता येते. त्यामुळे एकूण रॅम १२ जीबीपर्यंत उपलब्ध होऊ शकते. स्टोरेजसाठी ६४ जीबी यूएफएस २.२ देण्यात आले आहे. फोनमध्ये उष्णता नियंत्रणासाठी १३,७०० चौरस मिलिमीटर क्षेत्रफळाची हीट मॅनेजमेंट व्यवस्था आहे.

या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची ७,००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी. यामध्ये १५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५ वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. कॅमेरा विभागात मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा ओम्नीव्हिजन ओव्ही१३बी१० मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याला एफ/२.२ अपर्चर, ऑटोफोकस, एलईडी फ्लॅश आणि १ ते १० पट झूमची सुविधा आहे. याच्या मदतीने ३० फ्रेम प्रति सेकंद वेगाने १०८०पी व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल ४जी, वाय-फाय ५, ब्लूटूथ ५.२ आणि विविध नेव्हिगेशन प्रणालींचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, यूएसबी २.० टाइप-सी पोर्ट आणि ३.५ मिलिमीटर हेडफोन जॅक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात ट्रिपल कार्ड स्लॉट असून, दोन नॅनो सिम आणि एक मेमरी कार्ड एकाच वेळी वापरता येते. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज २ टीबीपर्यंत वाढवता येते. फोनच्या बॉक्समध्ये चार्जर, टाइप-ए ते टाइप-सी केबल, सिम ट्रे इजेक्टर आणि प्रोटेक्टिव्ह केस देण्यात येतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande