दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या - धिरज देशमुख
लातूर, 23 सप्टेंबर (हिं.स.) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना धिरज देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे बाधित तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत,
देवेंद्र फडणवीस


लातूर, 23 सप्टेंबर (हिं.स.) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना धिरज देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे बाधित तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीक विम्याचा लाभ आणि विशेष दुष्काळ निवारण पॅकेज देण्याची मागणी केली.

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसातील दीर्घ खंड आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील पावसाची कमतरता आणि पिकांवरील परिणामाबाबत प्रशासनाकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच २०२३-२४ मधील ७२ तासांच्या तांत्रिक कारणावरून नाकारलेले पीक विमा दावे पुनर्विचारासाठी खुले करून, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा लाभ मिळावा, अशी मागणी केली.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande