विभागीय विज्ञान मेळाव्यात रत्नागिरीची शाल्वी शिवगण द्वितीय
रत्नागिरी, 23 सप्टेंबर (हिं.स.) । कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम स्कूलमधील शाल्वी प्रदीप शिवगण हिने विभागीय स्तरावर द्वितीय
शाल्वी शिगवणचा गौरव


रत्नागिरी, 23 सप्टेंबर (हिं.स.) । कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम स्कूलमधील शाल्वी प्रदीप शिवगण हिने विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.

आता राज्यस्तरावर होणाऱ्या पुढील फेरीसाठी तिची निवड झाली आहे. तिला मार्गदर्शन करणाऱ्या स्कंधा सनगरे व तिचे सर्व मार्गदर्शक शिक्षक तिचे पालक यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर व पदाधिकाऱ्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande