
लातूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। चाकूर दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदेसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी चाकूर तालुक्यातील आष्टा परिसराचा दौरा केला. आमदार कुडाळकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. पिकांची झालेली हानी, पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणी याबाबत शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार मंगेश कुडाळकर यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, नुकसानीचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis