परभणीत 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी वस्तीनिहाय शिबिरांचे आयोजन
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। ‘राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ परभणी जिल्ह्यात र
परभणीत 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी वस्तीनिहाय शिबिरांचे आयोजन


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

‘राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ परभणी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दि. 27, 28 व 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील विविध वस्त्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान.pdf

या अभियानाचा मुख्य उद्देश विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या वस्त्यांमध्येच उपलब्ध करून देणे हा आहे. आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी आवश्यक कार्यवाही या शिबिरांमध्ये करण्यात येणार आहे. भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान.pdf

तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना यांसह पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

वस्तीनिहाय विशेष शिबिरे

परभणी जिल्ह्यात पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू व परभणी या तालुक्यांतील विविध वस्त्यांमध्ये दि. 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान शिबिरे घेण्यात येणार आहेत. संबंधित वस्त्यांमध्ये पात्र नागरिकांचा प्रत्यक्ष शोध व सर्वेक्षण करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान.pdf

अभियानादरम्यान लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करण्याबरोबरच विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून प्रशासकीय यंत्रणेकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून अभियानाचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, तसेच नागरिकांनी उपलब्ध शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande